ठाणे : घोडबंदर येथील फाऊंटन भागात ठाण्याहून वसईच्या दिशेने जाणारा कंटेनर उलटल्याने घोडबंदर मार्गावर फाऊंटन हॉटेल ते ओवळेपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा परिणाम ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मर्गिकेवरही झाला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! कल्याणमध्ये किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या, मारेकरी मित्र गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्याहून वसईच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास फाऊंटन भागात उलटला. या घटनेमुळे फाऊंटन हॉटेल ते ओवळे या दोन्ही दिशेकडील मर्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार आणि प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ९.३० नंतरही कंटेनर रस्त्याच्या बाजूला करणे शक्य झाले नाही.