ठाणे : ठाण्यातील कौपिनेश्वर या पुरातन मंदिरात तसेच ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरात वाहतूक बदल लागू केले आहेत. बाजारपेठ परिसरात उद्या ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त पहाटे पासून ते रात्री ११ पर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत. तर, ढोकाळी, कोलशेत भागात ११ मार्चपर्यंत वाहतूक बदल लागू असतील.

बाजारपेठेतील वाहतूक बदल पुढील प्रमाणे –

  • कोर्टनाका येथून सुभाषपथ, मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या वाहनांना जांभळीनाका परिसरात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टाॅवरनाका मार्गे वाहतूक करतील.
  • बाजारपेठेतून जांभळीनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना ए-वन फर्निचर या दुकानाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह परिसरातून वाहतूक करतील. हे वाहतूक बदल उद्या ८ मार्च रोजी पहाटे ३ ते रात्री ११ पर्यंत लागू असतील.

हेही वाचा : ठाण्यात दिघे साहेबांच अस्तित्व कोण पुसतयं ? आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचा सवाल

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध

ढोकाळी, कोलशेत भागातील वाहतूक बदल पुढील प्रमाणे –

ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिरात देखील महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते. या भागात जत्रा भरत असते. त्यामुळे ठाणे शहरातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे येथे देखील मोठे वाहतूक बदल लागू आहेत.

  • माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती समोरून कोलशेत, ढोकाळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रभाग समितीजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तत्वज्ञान सिग्नल, आर माॅल मार्गे वाहतूक करतील.
  • कोलशेत, ढोकाळी येथून माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना ढोकाळी सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मनोरमानगर मार्गे किंवा लोढा बिजनेस डिस्ट्रीक्ट, ब्रम्हांड मार्गे वाहतूक करतील.

हेही वाचा : ठाणे: फुटीच्या चर्चेवर काय म्हणाले राजन विचारे…

  • घोडबंदर, आर माॅल, विहंग हाॅटेल येथून कोलशेतच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना आर माॅल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मनोरमानगर, ढोकाळी सिग्नल येथून डावे वळण घेऊन वाहतूक करतील. हे वाहतूक बदल ८ ते ११ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी चार ते रात्री १० पर्यंत लागू असतील.