ठाणे : कळव्यातील एका टॅक्सी चालकाची तिघांनी राजस्थानमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात दोघांना बुधवारी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा येथील विटावा परिसरात विजय घाडगे (४९) हे त्यांची पत्नी आणि मुलासह राहतात. दररोज ठाणे ते पुणे— नाशिक अशी टॅक्सी चालवितात. २१ ऑगस्टला त्यांना चिपळूणला जाणारे दोन प्रवासी भेटले. त्यांनी विनंती केल्यानंतर विजय त्यांना चिपळूण येथे सोडून आले. त्या प्रवाशांनी विजय घाडगे यांचा मोबाइल क्रमांकही घेतला. तसेच यानंतर पुढे कुठे जायचे असल्यास संपर्क करू असेही विजय यांना सांगितले. विजय घरी आल्यानंतर २८ ऑगस्टला पुन्हा या प्रवाशांनी विजय यांना संपर्क साधून चिपळूणला बोलावले.  तेथून  राजस्थानला पोहचेपर्यंत विजय हे कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र, ३० ऑगस्टला त्यांचा फोन अचानक बंद येऊ  लागला.   याप्रकरणी १ सप्टेंबरला  कळवा पोलीस ठाण्यात विजय हरवल्याची तक्रार दाखल केली.  विजय यांचा भाचा सागर मोरे   राजस्थान येथील शिवदासपुरा येथे गेले.  तेथील पोलीसांना एक मृतदेह मिळाला होता. तो विजयचा होता. चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  विजय कुमार, विक्रम सिंह यांना अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalwa driver killed in rajasthan zws
First published on: 15-09-2020 at 02:46 IST