Kalyan Murder: कल्याणमधील चिंचपाडा गावात पार्टी सुरू असताना दारू कमी पडली म्हणून चक्क एकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. २५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या मित्रांनी चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून फेकून दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजतेय. ही घटना २७ जून रोजी घडली होती, ज्यात कार्तिक वायाळ याचा मृत्यू झाला आहे. आरोपींमध्ये त्यांचे मित्र, नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान टाईम्सने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, रात्री उशिरा दारू संपली तेव्हा जे चौघे मद्यधुंद अवस्थेतच होये. दारू न मिळाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. यामुळे अपमानास्पद वाटल्याने कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली आणि तिन्ही मित्रांना घरातून बाहेर निघून जायला सांगितलं. यामुळे तणाव वाढला आणि कार्तिक थेट भांडणानंतर झोपायला गेला. भांडणात कार्तिक झोपायला गेल्यावर निलेश संतापला होता. सागर व धीरजच्या मदतीने निलेश कार्तिकच्या खोलीत शिरला आणि त्याला बाल्कनीत ओढून घेऊन गेला. या तिघांनी ढकलताच कार्तिक बाल्कनीतुन खाली पडला. वरून पाहताच कार्तिक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला या तिघांना दिसून आला, खाली जाऊन पाहताच कार्तिकला गंभीर दुखापत झाल्याचे तिघांच्या लक्षात आले.

हे ही वाचा<< मंदिराची तोडफोड करण्याचा मुस्लिम व्यक्तीवर आरोप; पण दर्ग्यात दडलं होतं सत्य, समोर आली Video मागची खरी गोष्ट

ही अवस्था लक्षात येताच कार्तिकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पण स्वतःचा बचाव करण्यासाठी तोपर्यंत निलेश, सागर व धीरजने एक वेगळीच कहाणी रचली. कार्तिकने निलेशच्या डोक्यात बॉटल मारल्याने त्याला दुखापत झाली आणि म्हणून अन्य दोन मित्र निलेशला घेऊन रुग्णालयात गेले होते. कार्तिक कसा खाली पडला याविषयी त्यांना काहीच माहित नाही असाही दावा त्यांनी केला. मात्र कार्तिकच्या कुटुंबाने पोलिसांनी अधिक तपास करण्यासाठी विनंती केली व त्यातच पुढे वाढदिवसाच्या पार्टीत घडलेल्या घटनांचा खरा क्रम उघड झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्य माहितीनुसार, उल्हासनगर पोलिसांनी आता निलेश, सागर आणि धीरज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.