कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी, मोहिली आणि नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये मंगळवार (१९ डिसेंबर) रोजी देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे कल्याण डोंबिवली शहरांना होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे पालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली शहरांना बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून १४४ दशलक्ष लिटर, नेतिवली केंद्रातून १५० दशलक्ष लिटर, मोहिली केंद्रातून १०० दशलक्ष लिटर नियमित पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रांच्या दुरुस्ती आणि यांत्रिकीकरणाचे काम मंगळवारी केले जाणार आहे.

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ

हेही वाचा : प्रेयसीला जखमी करणारा आरोपी अद्याप फरार; ठाणे पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा

ही जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण मधील टिटवाळा, मांडा, अटाळी, आंबिवली आणि परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने बुधवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. असे आवाहन कार्यकारी अभियंता राठोड यांनी केले आहे.