भगवान मंडलिक

कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे मागील पंधरा वर्षापासून नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना शह देण्यासाठी आता शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख आणि खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड जोरदार प्रयत्न करत आहेत. कल्याण पूर्व विधानसभेची उमेदवारी मिळेल, असा आश्वासक शब्द शिवसेनेच्या वरिष्ठांकडून मिळाल्यापासून महेश गायकवाड पायाला भिंगरी लावून दोन वर्षापासून फिरत आहेत. हीच अस्वस्थता आमदार गायकवाड यांना असह्यय होत आहे. त्यामुळे जमिनीच्या वादाप्रमाणे विधानसभेच्या उमेदवारीचा विषयही गोळीबाराच्या घटनेमागे असल्याची चर्चा आहे.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मागील पंधरा वर्षापासून गणपत गायकवाड यांनी केले. यापूर्वी दोन वेळा ते या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. राज्यातील सत्तेचा कल पाहून त्यांनी वेळोवेळी सत्तेला पाठबळ दिले. दोन वेळा ते राष्ट्रवादीचे समर्थक होते. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली. गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. कल्याण पूर्वचा बहुतांशी भाग चाळी, झोपडपट्टी आणि काही भागात इमारतींचा आहे. या भागाचा समतोल विकास करण्यात आमदार गायकवाड अपयशी ठरले, असे नागरिक सांगतात. निवडणूक आली की वर्षभर नागरिकांना निशुल्क केबल पाहण्याचे आश्वासन द्यायचे आणि त्या बळावर निवडणूक जिंकण्याचे काम गायकवाड यांनी केले. मागील १५ वर्षात कल्याण पूर्व भाग विकासपासून दूर राहिला. त्यामुळे या भागातील नागरिक नवीन उमेदवाराच्या शोधात आहे.

हेही वाचा >>>“घटना दुर्दैवी…महेश गायकवाडांनी लवकर बरे व्हावे”, मुख्यमंत्र्यांची गोळीबार प्रकरणानंतर पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचा जोर

कल्याण पूर्व भागातील बकालपण विचारात घेऊन, शिवसेनेच्या वरिष्ठांकडून खात्रीलायक शब्द मिळाल्यामुळे दोन वर्षापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले महेश गायकवाड पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. कल्याण पूर्व भागातील नागरी समस्या, विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मेहनत घेत आहेत. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक, आता शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. एक धडपड्या, नव्या उमेदीचा साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण करणारा शिवसैनिक हाताशी असल्याने खासदार शिंदे यांनी त्यांना विकास कामे आणि अन्य कामांसाठी पूर्णपणे सहकार्य करीत आहेत. महेश यांचे कर्तृत्व आता गणपत गायकवाड यांच्यापेक्षा उठून दिसू लागल्याने आमदार गायकवाड यांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर करत आहेत. पूर्व भागाचे नेतृत्व भाजपाचे गणपत गायकवाड करत आहेत. भोईर यांच्या विकास कामांचा झपाटा आहे. पूर्वेत गणपत गायकवाड यांनी आमदारकीचे तीन टप्पे (टर्म) पूर्ण केले आहेत. त्यामुळे पश्चिमेची उमेदवारी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना देऊन, पूर्व भागात खासदार शिंदे समर्थक महेश गायकवाड यांची वर्णी अदलाबदलीने लावण्याची चर्चा युतीच्या वरिष्ठांमध्ये झाल्याचे समजते. त्यामुळे पवार, गायकवाड दोन वर्षापासून जनसंपर्कातून लोकांपर्यंत पोहचत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या वारसाला नाहीच, पण आपणासही उमेदवारी मिळण्याबाबतचा संशय गणपत गायकवाड यांना आहे. दोन वर्षापासून महेश आणि गणपत यांच्यात विकास कामे, व्यक्तिगत पातळीवर टीका, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभेवर मांड ठोकण्याच्या या स्पर्धेची पार्श्वभूमी गोळीबाराच्या घटनेमागे आहे, असे जाणकार सांगतात.