आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरात फलक लावताना यापुढे भाजपच्या फलकांवर शिवसेनेच्या एकाही नेते, पदाधिकाऱ्यांची प्रतीमा न लावण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढील काळात आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना, भाजप मधील स्थानिक पातळीवरील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

Water stagnant in pits dug for metro works risk of epidemics
मेट्रो कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत साचलेले पाणी, साथीच्या आजारांचा धोका
six-year-old boy was killed for a trivial reason in Bhiwandi
भिवंडीत सहा वर्षीय मुलाची क्षुल्लक कारणावरून हत्या
Thackeray group, resign, Thane,
ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Radhai, building, Dombivli, illegal building Dombivli,
डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ सतरा दिवसात जमीनदोस्त करा, मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश
Dombivli, illegal constructions, Devichapada, Kumbharkhanpada, Ganeshnagar, Ulhas river, mangroves, flood, municipal authorities, land mafia,
डोंबिवलीत देवीचापाडा येथील बेकायदा चाळी पुराच्या पाण्याच्या विळख्यात, खाडी किनारा बुजवून उभ्या केल्या होत्या चाळी
Kalyan, complaint, Khadakpada police, ISMA, defamation, Devendra Fadnavis, Gajabhau, Twitter, Home Minister, Maharashtra Police, investigation, kalyan news,
कल्याणमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
Kalyan, hairdresser, sexual assault, lodge, former friend, police complaint, Kolsevadi, threat, investigation, kalyan news,
कल्याणमध्ये केस सजावटकार महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी
Thane, bike rider, dies, pothole, Kalyan Shil Road, speeding car, accident, Sagar Misal, internal injuries, CCTV footage, Shil Daighar police station, road safety, citizen anger, temporary repairs, thane news,
ठाणे : खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू, मागून येणाऱ्या भरधाव मोटारीची धडक; शिळफाटा भागातील घटना
Badlapur, Ulhas river, water level, flood, decrease, Raite Bridge, Kalyan Ahmednagar National Highway, waterlogging, repairs, kalyan news, latest news, marathi news,
उल्हास नदीचे पाणी ओसरले, महामार्ग उखडला; बदलापुरात पाणी पातळी १४.७० मीटरवर

कल्याण पूर्व भाजप मंडळाच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड, त्यांचे कार्यकर्ते यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. केंद्रीय मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड यांच्या विषयावर काही भाष्य करत नसल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी मंत्री पाटील, मंत्री चव्हाण यांना संपर्क केला. ते बैठकीत व्यस्त असल्याचे, दिल्ली येथे गेल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पालिकेचे कर्मचारी लाच घेताना अटक

बैठकीत चर्चा

कल्याण जिल्हा भाजप मंडळाची गाव चलो अभियान, विकास संकल्प यात्रा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनीमय करण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसापूर्वी बैठक झाली. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याऊलट कल्याण पूर्वेतील भाजपची ताकद अधिक वाढविण्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन करण्यात आले. आगामी काळात भाजपचे जे कार्यक्रम असतील त्या फलकांवर शिवसेनेच्या एकाही नेते, पदाधिकाऱ्याची प्रतीमा न लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आमदार गायकवाड यांनी टोकाची कृती का केली, याचेही विचार मंथन वरिष्ठ पातळीवर झाले पाहिजे. त्यांच्या चुकीच्या कृतीचे समर्थन कोणीही करणार नाही, पण त्यांच्यावर ही वेळ का आली. ती कोणी आणली. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, गटार, आंबेडकर स्मारक आणि अशा अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे कोण आणत होते, याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करावा, अशीही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. आमदार गायकवाड यांच्यावर पक्षाने एकतर्फी कारवाई करू नये, अशीही चर्चा करण्यात आली.

हेही वाचा >>> कल्याण : महेश गायकवाड हल्ल्यातील संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण प्रसारित

मागील वर्षी शिवसेना-भाजप मधील तेढ वाढल्यानंतर कल्याण पूर्वेतील भाजपच्या बैठकीत सार्वजनिक बांंधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला होता. कल्याण लोकसभेसाठी नवीन उमेदवार देण्याची मागणी लावून धरली होती. सामोपचाराने हा विषय मिटविण्यात आला होता. आता गोळीबार प्रकरणाने पुन्हा शिवसेना-भाजपची वितुष्टाच्या दिशेने स्थानिक पातळीवर वाटचाल सुरू आहे.

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अती त्रासामुळेच आमदार गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील नेत्यांचे मत झाले आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संपर्क अभियानावर चर्चा झाली. फलकावर प्रतीमा न लावण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर त्याबाबत माहिती नाही. – नरेंद्र सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा भाजप.