कल्याण : आपल्या मोटारीला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्या बद्दल एका मोटार कार चालकाने मंगळवारी रात्री एका दुचाकी स्वाराच्या अंगावर मोटार घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोप पंपाजवळ हा प्रकार घडला. दुचाकी स्वाराने सतर्कता बाळगली अन्यथा मोटार चालक पेट्रोल पंपाला धडकून मोठा अनर्थ घडला असता.

कल्याण पूर्व भागात राहणारा रोहन शिंदे आपल्या मित्रासह हिराघाट भागातील पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री पेट्रोल भरण्यासाठी चालला होता. त्याच रस्त्याने एक मोटार कार चालक चालक चालला होता. मोटार चालकाने अचानक रोहन शिंदेच्या दुचाकीला मागे टाकण्यासाठी जोराने कट मारली. रोहन हळू दुचाकी चालवित असल्याने त्याने तात्काळ दुचाकी बाजूला घेतली आणि कार चालकाला मोटार संयमाने चालविण्याची सूचना केली.

हेही वाचा…लोकलमधील अपंग राखीव डब्याला आपत्कालीन पायरीच नाही

या सांगण्याचा राग आल्याने मोटार कार चालकाने रोहन शिंदेच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याला पेट्रोल पंप भागातील रस्त्यावर गाठले. रोहनच्या दुचाकीला पाठीमागून जोराने धडक दिली. या धडकेत रोहनसह मित्र जमिनीवर दुचाकीसह पडले. संतप्त कार चालकाने रोहनच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी रोहन पेट्रोलपंप दिशेने धाव घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. मोटार चालकाने भरधाव कार पेट्रोल पंप दिशेने आणली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

हेही वाचा…डोंबिवलीत पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. उल्हासनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे रोहनने माध्यमांना सांगितले.