कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ४७ टक्के मतदान झाले. नागरिकांनी अधिक संख्येने मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग, पालिका, शाळांतर्फे मतदार जागृतीचे उपक्रम राबवण्यात आले. पण मतदारांनी या वेळीही मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसले. सर्व पक्षांमधील ७५० उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. बाचाबाची, हाणामाऱ्या, काही ठिकाणी लाठीहल्ला, बोगस मतदानाचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांतते पार पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका निवडणुकीसाठी १२२ प्रभाग आहेत. खंबाळपाडा, आशेळे, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. २७ गावांमधील संदप भोपर, वसार माणेरे प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. भाल गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

आज ११७ प्रभागांमध्ये मतदान पार पडलेसोमवारी सकाळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc voting only 47 percent
First published on: 02-11-2015 at 06:10 IST