ठाणे : आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. हा आनंद आश्रम सामन्यासाठी मंदिर होते. दिघे साहेब शिवसेनेत होते, परंतु आनंद आश्रमात त्यांनी कधीही कोणत्या पक्षाची पाटी लावली नाही. मात्र या स्वार्थी मंडळींनी आज त्याच आनंद आश्रमाचा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजार मांडलाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आज ठाण्यात पक्षाच्या निर्धार मेळाव्यात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी काल परवापर्यंत सर्वसामान्य माणूस आनंद आश्रमात जावून दिघे साहेबांच्या तस्विरीचे पूजन करत असे. आनंद दिघे यांनी आनंद आश्रमातून काम करत असताना तेथे कधीही स्वतःच्या नावाची, पक्षाची पाटी लावली नाही. मात्र त्याच आनंद आश्रमाचा स्वतःच्या स्वार्थासाठी, मिळकत म्हणून या मंडळींनी बाजार मांडला, अशी टीका केदार दिघे यांनी यावेळी बोलताना केली. ठाण्यातील गडकरी नाट्यगृहात आयोजित केलेल्या या मेळाव्यात बोलताना केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर सडकून टीका केली.

हेही वाचा – कल्याणमध्ये वृद्धेच्या हत्येप्रकरणी घर मालकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “मुलं गेल्यावर दिघेंनी दुःखातून बाहेर काढलं आणि तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला…”

संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य माणूस, शिवसैनिकासाठी हा आश्रम पूजनीय होता. मात्र या मंडळींनी स्वतःच्या घाणेरड्या राजकरणासाठी आश्रमावर स्वतःच्या पक्षाचे आणि स्वतःचे नाव लावल्याची टीका दिघे यांनी केली. यांना मानाचा मोठेपणा असता तर केवळ दिघे साहेब यांचे नाव आश्रमावर लावले गेले असते. मात्र मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय की यांची वृत्ती, विचार इतके संकुचित आहेत की यांना स्वतः शिवाय दुसऱ्याचे काही दिसतच नाही, अशा शब्दांत दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar dighe comment on cm eknath shinde regarding anand ashram in thane ssb
First published on: 26-02-2023 at 17:32 IST