ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कोपरी पूलावर तुळई उभारली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार  आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील जड- अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहर, मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर मार्गावर होणार असून मोठी वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. तर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक कोपरी पूलावरून सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> बदलापूर : रिक्षा, जीप चालकांच्या बेकायदा थांब्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा; वाहनांच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

हेही वाचा >>> VIDEO: ….अन् रिक्षालाचकाने तरुणीला रस्त्यावरुन फरफटत नेलं, ठाण्यातील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी रेल्वे पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज हजारो हलकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक ठाणे, नाशिक, भिवंडी, कल्याण येथून मुंबईच्या दिशेने होत असते. सध्या या पूलाच्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएकडून सुरू आहे. यातील दोन नव्या मार्गिका सुरू झालेल्या आहेत. तर मुख्य पूलावरील मार्गिकांचे म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर तुळई उभारली जाणार आहे. या कामासाठी सध्या सुरू असलेल्या वाहिनीवर क्रेन ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही मार्गिका बंद करावी लागणार आहे. हे काम शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ पर्यंत सुरू राहील. या कामाचा परिणाम मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, पूर्व द्रुतगती महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणार आहे. त्यातच घोडबंदर मार्गावरही मेट्रो निर्माणासाठी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता शहरात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> बदलापूर : रिक्षा, जीप चालकांच्या बेकायदा थांब्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा; वाहनांच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

असे आहेत वाहतूक बदल

– नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात असेल. ही वाहने खारेगाव टोलनाका येथुन डावीकडे वळण घेवून गॅमन चौक,  पारसिक रेती बंदर,  मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा येथून महापे मार्गे, रबाळे,  ऐरोली पूल मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

– घोडबंदर मार्गाने पूर्व द्रुतगती महामार्ग मार्गे मुंबईत जाणा-या जड – अवजड वाहनांना माजीवाडा येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने माजीवाडा पूलावरून खारेगाव टोलनाका येथुन डावीकडे वळण घेवून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा येथून महापे मार्गे, रबाळे ऐरोली पूल येथून इच्छित स्थळी जातील.

– नाशिक, घोडबंदर येथून मुंबईत जाणाऱ्या हलक्या वाहनांना तीन हात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने साकेत येथून डावीकडे वळण घेवुन महालक्ष्मी मंदिर, साकेत रोड, खाडीपूल, कळवा,विटावा मार्गे जातील. किंवा ठाणे शहरातून कोर्टनाका, खाडीपूल, कळवा मार्गे वाहतूक करतील. तसेच घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातुन मुंबईत जाणारी हलकी वाहने तिन हात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एल.बी.एस. रोड, मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईत इच्छित स्थळी जातील.  किंवा गुरूद्वारा सेवा रस्ता, बाराबंगला, आनंद नगर मार्गे वाहतूक करतील.