महसूल सेवेतील सनदी अधिकारी समीर वानखेडे यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांचे भविष्य’ या विषयावर २८ जानेवारी, शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.युवकांच्या जीवनात स्पर्धा परीक्षांना खूप महत्व आहे. या स्पर्धा परीक्षांमधून अनेक मुले यशाची शिखरे गाठतात. अशा मुलांना अनुभवी सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष विजय डुंबरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये जमीन व्यवहारात मुंबईतील विकासकाची २२ लाखाची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी मधील पेंढरकर महाविद्यालया समोरील रोटरी भवन मध्ये संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक तरुणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव सनदी लेखापाल एस. गायथ्री यांनी केले आहे.