कल्याण– आपल्या प्रेमप्रकरणात मित्र अडथळा ठरतो. त्याचा राग आल्याने मित्राला रात्रीच्या वेळेत दारु पाजून त्याला बेशुध्द करुन बेदम मारहाण करुन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिले. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपी मित्राला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधिश एस. बी. कचरे यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

पाच हजार रुपये दंड न भरल्यास आणि तीन महिने कारवासाची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. अन्य एका आरोपाखाली तीन महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कल्याण पूर्वेतील काकाच्या ढाब्याजवळ आडिवली गावातील राजाराम नगरमधील साई प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर हा प्रकार सहा वर्षापूर्वी घडला होता.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

हेही वाचा >>> Apple WWDC 2023 Live: iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर, महत्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर

विनोदकुमार राधेशाम चौधरी हे मयताचे नाव आहे. जनार्दन वर्मा उर्फ चौधरी असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विनोदकुमार आणि जनार्दन हे मित्र होते. जनार्दन श्रीकृष्ण विकासकाच्या कार्यालयात काम करत होता. जनार्दनाच्या माध्यमातून विनोदकुमारची कल्याणमध्ये हाॅटेलमध्ये महिला सेविका म्हणून काम करणाऱ्या एका २७ वर्षाच्या महिलेशी ओळख झाली होती. ही महिला एकटीच आडिवली मधील साई प्लाझा इमारतीत भाड्याने राहत होती. रात्रीच्या वेळेत मद्यपान करुन झाल्यावर विनोदकुमार चौधरी या महिलेच्या घरी येत होता. दोघांचे प्रमेसंबंध जुळले होते. आपल्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेशी विनोदकुमारचे प्रेमसंबंध जुळल्याचा राग जनार्दन चौधरीला होता. तो संबंधित महिलेला विनोदकुमारला घरी येऊन देऊ नकोस म्हणून सतत सांगत होता. महिला त्याचे म्हणणे ऐकत नव्हती.

हेही वाचा >>> कल्याण: टिटवाळ्यात महावितरणच्या ठेकेदारावर गोळीबार

जनार्दनच्या मनात विनोदकुमार विषयी राग निर्माण झाला होता. चार वर्षापूर्वी जुलै मध्ये विनोदकुमार आणि जनार्दन या महिलेच्या घरी एकत्र आले. दोघेही एकत्र बसून दारू पिऊ धुंद झाले. यावेळी जनार्दन विनोदकुमारला तू या महिलेच्या घरी यायचे नाही. तुमचे संबंध तुमच्या कुटुंबीयांना माहिती झाले आहेत असे सांगू लागला. यावरुन विनोद, जनार्दन यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात जनार्दनने विनोदकुमारला इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बोराडे गुन्हा दाखल झाला होता. सुरेशकुमार राऊत यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणात सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकार वकील ॲड. रचना भोईर यांनी बाजू मांडली. पोलीस ठाणे आणि न्यायालय समन्वयक म्हणून हवालदार ए. आर. गोगरकर, हुकुम बजावण्याचे काम हवालदार के. आर. बाशिंगे, पी. के. आव्हाड यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, मदने, लंबे यांनी मार्गदर्शक अधिकारी म्हणून काम पाहिले.