मुंबईच्या मालाड-मालवणी परिसरात २०१५ साली झालेल्या विषारी दारूकांड प्रकरणातील प्रमुख फरारी आरोपी धर्मेंद्रसिंग शिवबली सिंग तोमर उर्फ संजयसिंग हा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले.  त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठाणे पोलीस चौकशीनंतर आरोपी तोमर उर्फ संजयसिंग याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर मालाड-मालवणी विषारी दारूकांडात तब्बल १०६ जणांनी जीव गमावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१५ साली मालवणी परिसरात विषारी दारूकांड घडला होता. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या घटनेनंतर सिंग फरार होता. मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी झाला. मात्र ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई विषारी दारूकांडातील फरारी आरोपी धर्मेंद्रसिंग शिवबली सिंग तोमर उर्फ संजयसिंग (३९) व्हीआयपी राजेंद्रनगर इंदौर मध्यप्रदेश येथे असल्याची माहिती पथकाचे वरिष्ठ नितीन ठाकरे यांना मिळाली. यावेळी शिळ डायघर परिसरातील अवैध दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या केमिकल्सचा पुरवठा केल्याची माहितीही दिली. त्यानुसार पथक इंदौर येथे रवाना  झाले आणि तोमर उर्फ संजयसिंग याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने मालवणी येथील विषारी दारू बनविण्यासाठी केमिकल्स पुरवठा केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malavani malad illicit liquor main accused arrested by thane police
First published on: 22-05-2017 at 19:06 IST