ठाणे : मध्य तसेच ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर  रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल गाडय़ा दिवा ते परेल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल परेल स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा जलद मार्गावरून धावतील.

अप जलद मार्गावरील लोकल  सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वा. या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला, तर डाऊन जलद मार्गावरील जलद तसेच अर्धजलद लोकल या स. १०.०५ ते दु.३.२२ वा. या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील.  रविवारी ठाणे ते वाशी ट्रान्स हर्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत वाहतूक बंद राहणार असून प्रवाशांना हार्बर तसेच मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ११ ते २ या वेळेत वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने चालविल्या जातील. तसेच रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega blocks on central and trans harbour tomorrow
First published on: 27-10-2018 at 01:01 IST