Premium

Mira Road Murder : “मनोज साने माझा मामा आणि तो खूप…”, सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

सरस्वती अनाथ होती आणि ती अनाथ आश्रमात राहात होती. मनोज तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिने मनोजची ओळख मामा अशी करुन दिली होती.

Mira road murder, Manoj Sane, Sarswati Vaidya
अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं?

श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे शिजवले, काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली. मात्र मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. तसंच सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडेही जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात मनोज सानेची चौकशी सुरु आहे. सरस्वती अनाथ होती. तिने मनोज हा आपला मामा आहे आणि तो खूप श्रीमंत आहे अशी ओळख करुन दिली होती. अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्घृण हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मात्र सरस्वती ही मनोजला भेटण्याआधी एका अनाथ आश्रमात राहात होती. आश्रमात काम करणाऱ्या अनु साळवे यांनी सांगितलं की सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती. तसंच माझा मामा खूप पैसैवाला आहे, श्रीमंत आहे असं तिने सांगितलं होतं. मनोज साने जेव्हा तिच्या आयुष्यात आला त्यानंतर ते दोघं कारने आश्रमात यायचे. सरस्वती तिच्यासह इतर मुलांसाठी जेवण, खाऊ आणि कपडे आणायची असंही साळवे यांनी सांगितलं. NDTV ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ती सुरुवातीला यायची तेव्हा ती खुश असायची. मात्र दोन वर्षांपासून ती दुःखी होती. जास्त कुणाशी बोलायची नाही. सरस्वती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ती अनाथ आश्रमातून तिच्या बहिणीकडे गेली होती. असंही साळवे यांनी स्पष्ट केलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira road murder case orphanage employee statement about manoj sane killed live in partner saraswati scj