ठाणे : समूह विकास योजनेला (क्लस्टर) आपणच राज्य शासनाकडून मान्यता मिळवून घेतली होती. पण, सध्या क्लस्टरच्या नावाखाली काहीजण आपली घरे भरण्याचे काम करीत आहेत, असे चित्र उभे राहिले, ते अभिप्रेत नव्हते असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच १७० एकरवर क्लस्टर योजना राबविणे अश्यक आहे. त्यामुळे ही योजना तुकडे करून राबविण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीच्या वतीने ठाण्यात मोफत दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. क्लस्टरला आपणच राज्य शासनाकडून मान्यता मिळवून घेतली होती. पण, सध्या क्लस्टरच्या नावाखाली काहीजण आपली घरे भरण्याचे काम करीत आहेत, असे चित्र उभे राहिले, ते अभिप्रेत नव्हते. छोट्या छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या, ज्यांची घरे धोकादायक झाली आहेत. त्यांना हक्काची आणि पक्की घरे मिळावित म्हणून आपण क्लस्टर आणले होते. १७५ एकरवर क्लस्टर करण्याचे जे धोरण आखण्यात आलेले आहे. ते पाहता, उभ्या आयुष्यात क्लस्टर होणार नाही. त्यामुळे १७० एकरचे दहा तुकडे करून ही योजना राबविण्यात यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

हेही वाचा – डोंबिवली जीमखाना सदस्यांचे व्यवस्थापनावर मनमानीचा आरोप करत लाक्षणिक उपोषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लस्टरची योजना जर दहा हजार चौरस मीटरवर राबविली तर ती शंभर टक्के पूर्णत्वास जाणार आहे. जो सुरुवातीला क्लस्टरबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आमच्यासोबत होते. त्यावेळेस दहा हजार चौरस मीटरच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवायची, असे ठरविण्यात आले होते. आता १७० एकरवर क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या भूखंडावर ही योजना राबविणे अशक्यच आहे. त्याऐवजी तुकडे केल्यास अनेक बांधकाम व्यवसायिक तयार होतील, असेही आव्हाड म्हणाले.