मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडे हल्ला झाला होता. शिवाजी पार्कमध्ये मॉर्निग वॉकला गेल्या एका टोळक्याने स्टम्प आणि बॅटने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी तीन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचा आज ( ९ मार्च ) १७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तेव्हा संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यावरून राज ठाकरेंनी इशारा दिला आहे. माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “…तर खरं सांगतो, महाराष्ट्राचं काही खरं नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जेव्हा निवडणुका लागतील…!”

राज ठाकरे म्हणाले, “संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं? पण, एक निश्चित सांगतो, ज्यांनी हे केलं, त्यांना पहिलं समजेल नंतर बाकीच्यांना. मात्र, माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाही.”

हेही वाचा : ठाण्यात राज ठाकरेंकडून मिश्किल टोले, उपस्थितांमध्ये एकच हशा, म्हणाले…

“अनेक पत्रकार पक्षांना बांधले आहेत. ते त्यांना प्रश्न विचार नाहीत. तसेच, राजू पाटील एकटे विधानसभेत पक्षाची भूमिका मांडत आहेत. ‘एक ही है लेकीन काफी है’,” असं म्हणत राज ठाकरेंनी राजू पाटील यांचं कौतुक केलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader raj thackeray first react sandip deshpande attack shivaji park ssa
First published on: 09-03-2023 at 20:34 IST