ठाणे : कर्नाटकामधील महाविद्यालयात हिजाब बंदी घालण्यावरून सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत असतानाच, रविवारी दुपारी मुंब्रा येथील कौसा परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. सामाजिक संघटनांनी काढलेल्या या मोर्चात इतर धर्माच्या महिलाही सहभागी झाल्या होत्या.
मुंब्रा परिसरातील युथ ऑफ कौसा गाव आणि रियाज एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट या सामाजिक संघटनांनी हिजाबच्या समर्थनार्थ मुंब्रा येथील कौसा भागातील जामा मशीद ते दारुल फलाह मशीद असा मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो महिला मोठय़ा संख्येने सामील झाल्या होत्या.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
राजकीय पक्षांच्या सहभागाविना या मोर्चोचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात मुस्लीम समाजासह इतर समाजातील महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.