गोवरचा या आजाराचा सामना करण्यासाठी लसीकरण शिबिरे तसेच अंगणवाडयामध्ये विशेष लसीकरण मोहिम राबवा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना शनिवारी बैठकीत दिल्या आहेत. गोवर या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सातही दिवस बाह्य रुग्ण कक्ष सुरू ठेवा. मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेवून ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही, त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा, तसेच आरोग्य केंद्रात उपचार दिले जात आहेत असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करा अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांवर कारवाई करावी’; ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांची मागणी

मुंब्रा परिसरातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त बांगर यांनी कौसा रुग्णालय येथे बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर, नागरी आरोग्य केंद्र समन्वयक डॉ. राणी शिंदे, मुंब्रा विभागातील आरोग्य अधिकारी, स्थानिक माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंब्रा विभागात गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत असून आतापर्यत एकूण 54 संशयित रुग्ण आढळले आहेत, ही बाब जरी गंभीर असली तरी गोवर या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. एक वर्षापर्यत ज्या बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळून येत आहेत, त्यांची तपासणी बालरोगतज्ज्ञांमार्फत होणे आवश्यक आहे. जर बालरोगतज्ज्ञ नसतील तर वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करावी, जेणेकरुन गोवर या आजाराची तीव्रता आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार होतील. सर्व आरोगय केंद्रामध्ये वैदयकीय तपासणीसाठी आरोगय अधिकारी ही तीन पाळयामध्ये उपलब्ध असतील अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी सर्व वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा- कल्याण: दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कल्याण ते दिल्ली सायकल स्वारी

आशा वर्कर्सना देखील संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त् झाल्या आहेत, जेणेकरुन गोवरचे संशयित रुग्णांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यांच्याजवळ शून्य ते पाच या वयोगटातील सर्व बालकांची यादी उपलब्ध असते. आशा सेविकांनी सर्व बालकांचा पाठपुरावा करून गोवर असेल तर नागरी आरोग्य केंद्रात त्याची माहिती द्यावी. तसेच त्यांच्या मार्फत आढावा घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. खाजगी डॉक्टरांनाही गोवरबद्दल खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गोवर सदृश लक्षणे असलेला रुग्ण आला तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राकडे लगेच द्यावा. आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खाजगी डॉक्टरांकडून प्राप्त झालेल्यांची यादी तयार करुन त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याच्या सूचनाहि त्यांनी दिल्यया आहेत.

गोवरचा प्रादुर्भाव हा फेब्रुवारीपर्यत राहू शकतो, परंतु आता जो प्रादुर्भाव वाढत आहे, त्याची साखळी तोडणे महत्वाचे आहे, यासाठी बालकांचे नियमित लसीकरण होणे गरजेचे आहे, अन्यथा ही साखळी वाढण्याचीही शक्यता असल्याचेही त्यांनी त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी त्याच ठिकाणी विशेष लसीकरण शिबीर आयोजित करा. जेणेकरून ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण होण्यास मदत होईल. बालक कुपोषित असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करुन अतिरिकत आहार दया. अंगणवाडी सेविकांनीही घरोघरी जावून सर्वेक्षण करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा- विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?

गोवर या आजाराचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिम अधिक व्यापक प्रमाणात राबविणे गरजेचे आहे, यासाठी विशेष लसीकरणाचे शिबिरे आयोजित करन त्यात लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थाचा सहभाग घ्या. मुंब्रा येथील चारही आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास रुग्ण्वाहिका ठेवा, जेणेकरुन एखादा गंभीर रुग्ण आल्यास त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात नेणे सोईचे होईल. गोवरचे रुग्ण शोधण्यासाठी दुसरी सर्वेक्षणाची फेरी कौसा, मुंब्रा, कळवा येथे सुरू झाली असून त्यात गोवरची लक्षणे असलेली आणि लसीकरण झालेले नाही अशीही मुले आढळतील, असे असेही बांगर यांनी म्हटले आहे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motivate citizens to vaccinate to prevent outbreaks of measles notice to officials of thane municipal commissioner abhijit bangar dpj
First published on: 26-11-2022 at 18:35 IST