scorecardresearch

मुंब्रा बाह्यवळण मार्ग उद्या रात्रीपासून बंद होण्याची शक्यता

मुंब्रा बाह्यवळण मार्ग (मुंब्रा बायपास) रविवारी रात्री किंवा सोमवार रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे.

Mumbra Bypass road
मुंब्रा बायपास रोड ( फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: जिल्ह्यातील वाहतूकीसाठी महत्त्वाच्या असलेला मुंब्रा बाह्यवळण मार्ग (मुंब्रा बायपास) रविवारी रात्री किंवा सोमवार रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे. १ एप्रिल म्हणजेच, आज बाह्यवळण मार्ग बंद केला जाणार होता. पंरतु तांत्रिक अडचणीमुळे बंदचे नियोजन होऊ शकले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर पूलाकडील भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी रविवारी रात्री उशीरा किंवा सोमवारी रात्री हा मार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. हा मार्ग शनिवार, आज रात्रीपासून बंद केला जाणार होता. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्याने हा मार्ग रविवारी किंवा सोमवारी रात्री बंद केला जाणार आहे.

आणखी वाचा- वासिंदजवळ लोखंडी सळईमुळे कसारा लोकलला निर्माण झाला होता धोका

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून उरण जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने होत असते. तसेच ठाणे शहरातूनही हजारो वाहन चालक कामानिमित्ताने नवी मुंबईत वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात. हा मार्ग बंद झाल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांची वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी- काल्हेर, भिवंडी शहरातून वळविली आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई, कल्याण शहरात कोंडीची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 21:18 IST

संबंधित बातम्या