Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून ठाणे, मुंबईतील भूमीपूत्र करत आहेत. रविवारी, आज भूमिपूत्रांनी भिवंडी, ठाणे, नवी मुंबई मार्गे जासई अशा कार रॅलीचे आयोजन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. भिवंडीतील मानकोली नाका येथून या रॅलीला सुरूवात होत असून भूमिपूत्र महागड्या गाड्या घेऊन आता निघाले आहेत. या रॅलीचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील हे करत आहेत.
(Navi Mumbai International Airport ) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे नवी मुंबई, कल्याण, बदलापूर भागात लाखो आगरी कोळी बांधव वास्तव्यास आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त भूमीपूत्रांनी अनेक आंदोलने केली. या विमानतळाच्या नामकरणासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते. आंदोलन आणि मोर्चामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. परंतु सरकारकडून याबाबत हालचाली होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे. त्यामुळे आता कार रॅलीद्वारे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार रॅली आयोजित केली जाणार आहे. (Navi Mumbai International Airport)
समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात आवाहन (Navi Mumbai International Airport)
- दि.बा. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, उपनगरात आहे. ते प्रकल्प ग्रस्तांचे नेते होते. त्यामुळे या कार रॅलीसाठी वेगवेगळ्या स्तरावर समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. भूमिपूत्रांनी त्यांच्या व्हाॅट्सॲप स्टेट्स ठेवले होते. तर फेसबुक इन्स्टाग्राम समाजमाध्यमावर रील्स तयार केल्या होत्या.
अशी असेल कार रॅली (Navi Mumbai International Airport)
- ही कार रॅली भिवंडी येथील मानकोली नाका येथून रेतीबंदर, खारेगाव, कळवा, विटावा, दिघा, ऐरोली नाका, रबाळे नाका, रबाळे रेल्वे स्थानक मार्ग, घनसोली नाका, पावणे उड्डाणपूल, वाशी, कोपरीगाव, पामबीच, अरेंजा चौक, मोराज चौक सानपाडा, नेरुळ, करावे, नवी मुंबई महापालिका मुख्यालय चौकातून उरणकडे, रेतीबंदर, विमानतळ रेती बंदर गेट ते चिंचपाडा, पारगाव, ओवाळे आणि जासई असा या रॅलीचा मार्ग असेल.
महागड्या कार (Navi Mumbai International Airport)
- भूमिपूत्र त्यांच्या कार घेऊन यामध्ये सहभागी होत आहे. कार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अनेक कार या महाड्या आहेत. त्यामुळे या कार नागरिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत.