scorecardresearch

VIDEO : नवी मुंबई परिवहन बसला खोणी-तळोजा रस्त्यावर आग, जिवीतहानी नाही

शार्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.

VIDEO : नवी मुंबई परिवहन बसला खोणी-तळोजा रस्त्यावर आग, जिवीतहानी नाही
खोणी-तळोजा रस्त्यावर नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसला आग. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कल्याण: नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला गुरुवारी सकाळी दहा वाजता खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बस थांब्याजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध केल्याने जीवित हानी टळली.

बस आगीत खाक झाली आहे. शार्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला. नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस गुरुवारी सकाळी कल्याण-डोंबिवली दिशेने येत होती. खोणी-तळोजा रस्त्यावर असताना नागझरी गावा जवळील बस थांब्याजवळ बसमधून धूर येऊ लागला. चालकाने तात्काळ बस थांबून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी बस मधून उतरताच बसने पेट घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजुला कंपन्या, गोदामे असल्याने काही वेळ या भागात भीतीचे वातावरण पसरले होते.

VIDEO ::

हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानक परिसरात उल्हासनगर मधील मोबाईल चोर अटक

सकाळचे वातावरण आणि वारा नसल्याने आगीच्या ज्वाला इतस्ता पसरल्या नाहीत. काही क्षणात बसच्या चारही बाजुूने आग लागली. आगीत बस भस्मसात झाली. चालकाने तात्काळ माहिती नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. नवी मुंबई परिवहन विभागाचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ आग विझवली. आगीत बसची आसन व्यवस्था, यंत्रसामुग्री जळून खाक झाली, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. दुसऱ्या बसने प्रवाशांना इच्छित स्थळी रवाना करण्यात आले. बसला आग लागली त्यावेळी २० मिनिटे या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहने जागीच थांबून राहिल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या