लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे महापालिका चषक २०२३’ या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १८ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत ठाण्यातील तीन हात नाका येथील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘न्युज फोटोग्राॅफी’, ‘लँडस्केप’, ‘डेली लाईफ’, राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ‘स्मार्ट सिटी’, ‘एरीयल फोटोग्राॅफी’, ‘फेस्टीवल’, तर, जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ‘ मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे ’ असे विषय ठेवण्यात आले आहेत. तरुण छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी ‘पावसाळा’ हा विषय देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी पाच लाख ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

हेही वाचा… रेल्वे पुल दुर्घटना घडल्यास ठाणे पालिका जबाबदार; खासदार राजन विचारे यांचा पालिकेला इशारा

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५० हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी १५ हजार तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत, अशी माहिती आयुक्त बांगर यांनी दिली. जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा… पिसवली, टिटवाळ्यात बेकायदा चाळी जमीनदोस्त

या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी छायाचित्रकारांनी http://www.tsdps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळावर स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येईल. या स्पर्धेतील विजेती व निवडक छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात येतील. अधिक माहितीसाठी विभव बिरवटकर ९८६७७८२२८७ दीपक जोशी ९८२१७१९९८८ आणि सचिन देशमाने ९८३३९२४३९९ यांच्याशी संपर्क साधावा.