ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढून देखील ते सातत्याने बारामती लोकसभेमध्ये महायुतीचे वातावरण गढूळ करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. बारामतीमध्ये शिवतारे हे महायुतीचा धर्म तोडत असतील तर, ज्या लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार लढणार आहे. तिथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना समज दिल्यानंतरही त्यांच्याकडून वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण गढूळ होईल असे कृत्य करायचे नाही. शिवतारे यांच्या कृत्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेत्यांवर नियंत्रण नाही असे चित्र निर्माण होत आहे. बारामतीमध्ये शिवतारे हे महायुतीचा धर्म तोडत असतील तर, ज्या लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार लढणार आहे. तिथे आमचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात असे परांजपे म्हणाले.

What Jitendra Awhad Said?
जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप, “ज्या मनुस्मृतीने जातीभेद निर्माण केला, दुही माजवली….”
Umesh Patil on Shrirang Barne
महायुतीत वादाची ठिणगी? श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर उमेश पाटील म्हणाले, “थोडंफार उन्नीस बीस…”
Devendra Fadnavis
महायुतीत पुढील मुख्यमंत्री कोण असेल? फडणवीस स्पष्ट म्हणाले, “ज्या पक्षाच्या जास्त जागा…”
Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
Eknath Khadse
“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा; म्हणाले, “राजकारणातून निवृत्ती…”
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
sharad pawar on narendra modi
“अतृप्त आत्मा ५० नाही, तर ५६ वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतोय, पण तुमच्यासारखी व्यक्ती…” शरद पवारांचा पुन्हा पंतप्रधान मोदींना टोला!
Dhawale family, NCP,
पीडित ढवळे कुटुंबाला न्याय का दिला नाही? उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा सवाल

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

हेही वाचा – मुरबाडमधील कपील पाटील यांच्या बैठकीकडे किसन कथोरे समर्थकांची पाठ

हेही वाचा – जादा परताव्याच्या आमिषाने गुतंवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक, सॅमसन युनिट्रेड कंपनीचा संचालक अटकेत

शिवतारे हे महायुतीच्या दुधात मीठाचा खडा टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ मध्ये दाखविली असेही पंराजपे म्हणाले. कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून येथील लोकसभा कमळ चिन्हावर लढविली जावी अशी मागणी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराने आपल्या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भावना वरिष्ठांकडे मांडली आहे. यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.