पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच जव्हार हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना करोनाची लागण झाल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर 193 विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.

34 शिक्षक या शाळेत शिकवत होते. करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही बाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar 30 students and one teacher coronavirus positive school sealed sas
First published on: 17-03-2021 at 13:53 IST