D-Mart चे मालक राधाकृष्ण दमानी झाले अलिबागकर, पत्नीने खरेदी केला समुद्रकिनाऱ्यावरील आलिशान बंगला; किंमत आहे…

मागील वर्षीच दमानी यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये एक हजार १ कोटींचा बंगला विकत घेतला होता. त्यानंतर त्यांनी आता हा बंगला घेतलाय.

Beachside Maharashtra village house
हे घर समुद्रकिनाऱ्याला लागून असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो प्रातिनिधिक सौजन्य विकीमिडिया आणि इंडियन एक्सप्रेस)

करोना कालावधीत देशात लागू केलेल्या लॉकडाउननंतर आता परिस्थिती हळूहळू रुळावर येत आहे. असं असतानाच आता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधील जमीनीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईपासून जवळच असणाऱ्या अलिबागमधील जमीनींच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यातही बॉलिवूड, उद्योजक आणि गुंतवणूकदारांची ही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारी जागी सध्या हॉट फेव्हरेट रियल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ठरत आहे. असाच एक मोठा व्यवहार नुकताच या ठिकाणी पार पडला.

अवस येथे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला, सहा एकरांवर पसरलेला एक आलिशान बंगल्याचा नुकताच सौदा झाला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका पारशी कुटुंबाने आपली संपत्ती रिटेल किंग आणि शेअर बाजारामधील गुंतवणुकीचे जाणकार असणारे अब्जाधीश राधाकृष्ण दमानी यांची पत्नी श्रीकांतदेवी यांना विकला आहे.

डी-मार्टचे संस्थापक असणारे राधाकृष्ण दमानी यांनी मागील वर्षी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये एक हजार १ कोटींचा बंगला विकत घेतला होता. हे घर देशातील सर्वात महाग बंगला असल्याचं सांगण्यात आलं. राधाकृष्ण यांनी त्यांचे धाकटे बंदू गोपीकिशन दमानींसोबत हा बंगला विकत घेतला. आता दमानी कुटुंबाने अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केलीय. राधाकृष्ण दरमानी यांनी २०१५ मध्ये १३८ कोटी रुपयांना रेडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा या हॉटेलची मालकी मिळवली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दमानी कुटुंबियांची ही अलिबागमधील दुसरी संपत्ती आहे. यापूर्वी दमानी कुटुंबाने जिराडमध्ये २० एकरांवर पसरलेलं एक मोठं फार्म हाऊसही विकत घेतल्याचं सांगितलं जातं. सध्या खरेदी केलेला आलिशान बंगला हा मांडवा जेट्टीपासून सहा किलोमीटरवर आहे. या बंगल्याच्या आवारामध्ये अनेक फळझाडं असल्याचं सांगण्यात येत आहे. हे घर तब्बल ८० कोटींना विकलं गेलं आहे.

…म्हणून आलिबागला मागणी
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मुंबईमधील अती श्रीमंतांपैकी १५० कुटुंबे अलिबागमधील आपल्या फार्म हाऊसवर राहत होती. या कुटुंबियांपैकी अनेकजण सोशल नेटवर्किंगवर मोठमोठ्या आकारांच्या बागांमध्ये फिरताना, समुद्र किनाऱ्यावर चालताना आणि स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत होते. त्यामुळेच आता लॉकडाउननंतर येथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोरुन पुढे येत आहेत. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही दोन महिन्यापूर्वी आलिबागमधील मापगावमध्ये २२ कोटींचं घर खरेदी केलं. मुंबई ते मांडवा रो रो सेवा सुरु झाल्याने मांडव्यातील जमीनींचे भावही ५० टक्क्यांनी वाढलेत.

दमानींचा १००१ कोटींचा बंगला
मुंबईमधील मलबार हिल्स येथे दमानी कुटुंबाने विकत घेतलेला बंगला हा नारायण दाभोलकर मार्गावर आहे. या बंगल्याचं नाव ‘मधुकुंज’ असं आहे. हा बंगला दीड एकरांहून अधिक जमीनीवर आहे. बंगल्याचा एकूण बिल्डअप एरिया हा ६१ हजार ९१६ स्वेअर फूट इतका आहे. या बंगल्याच्या खरेदीसाठी दमानी कुटुंबाने ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pandemic property boom beachside maharashtra village house brought by shrikantadevi damani wife of radhakishan damani for rs 80 crore scsg

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या