कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नवनियुक्त सरकारने शहरात प्लास्टिक मुक्ती अभियानाची घोषणा केली असून हे अभियान सध्या यशस्वी ठरताना दिसत आहे. पालिकेच्या भरारी पथकाने तब्बल ८५ किलो प्लास्टिक पिशव्या धाडी टाकून जप्त केल्या असून चाळीस हजार रुपये दंड वसूल केला आहे.
बदलापूर पालिकेने प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहरात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. कारण, याच प्लास्टिक पिशव्यांमुळे २००५ साली शहरातील नाले तुंबून पूर परिस्थिती वाढण्यास मदत झाली होती. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये यासाठी २०१० साली तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्लास्टिक बंदी शहरात लागू केली होती. त्याला शहरातून चांगला प्रतिसादही मिळाला होता. परंतु, पुढे प्रशासनाच्या धोरण लकव्यामुळे ही बंदी टिकली नाही व शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला होता. परंतु, यातील धोका लक्षात घेऊन आता नव्या सत्ताधाऱ्यांनी ही बंदी पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2015 रोजी प्रकाशित
बदलापुरात प्लास्टिक मुक्ती अभियान
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नवनियुक्त सरकारने शहरात प्लास्टिक मुक्ती अभियानाची घोषणा केली असून हे अभियान सध्या यशस्वी ठरताना दिसत आहे.
First published on: 03-07-2015 at 02:56 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic free city