कशेळी पुलावरुन ठाणे खाडीत पडलेल्या महिलेचे प्राण एका पोलीस हवालदाराने धाडसाने वाचवून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेने उडी मारली की ती खाडीत पडली याचा तपास कापुरबावडी पोलीस करीत आहेत.
सुनिता कृष्णा पाटील ही बत्तीस वर्षीय महिला कशेळी पुलावरुन खाडीत पडली. तिथेच असलेल्या पोलीस हवालदार संजय पाटील यांनी तात्काळ तिला खाडीतून बाहेर काढले. या कामात येथील शाखाप्रमुख नंदू पाटील यांनीही मदत केली. पाण्यात पडल्याने जखमी महिलेल्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करम्ण्यात आले.