Dadar kabutar Khana Rada, Avinash jadhav : ठाणे : जैन समाज हा अतिशय शांत प्रिय समाज आहे. कबुतरखाण्यासाठी त्यांच्याकडून जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे. हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही. त्यांनी जर हे केले असेल तर, यासर्वाच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा हात असेल असा आरोप अविनाश जाधव यांनी ठाण्यात पत्रकारांनी बोलताना केला.

सध्या माधुरी हत्ती आणि दादर मधील कबुतरखाणा हे दोन विषय चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. यावर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माधुरी हत्तीचा विषय असो किंवा कबुतर खाण्याचा हे दोन्ही विषय भावनेशी जोडलेले आहेत. यासाठी सरकारने पुन्हा एकदा सर्वेच्च न्यायालयात जायला पाहिजे. हे विषय भावनेशी संबंधित असल्यामुळे याकडे सहानुभूतीने पहावे अशी विनंती सर्वेच्च न्यायालयाला करावी असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी मांडले.

मी अनेक वर्ष जैन समाजातील लोकांना ओळखतो काही माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून अशी घटना घडलेय असे तरी माझ्या लक्षात नाही. परंतू, या समाजाने जे कबुतरखाण्यासाठी जे केले ते आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचे का? तो देखील आमच्यासाठी धार्मीक विषय आहे. माधुरी हत्तीला आणण्याच्या बाबतीत एक वेगळाच आहे. मग, आम्ही पण जनताराला जायचे का? तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचे का ? असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केला.

कबूतर खानाच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर, माधुरी हत्तीच्या बाबतीत देखील एक न्याय होणे गरजेचे आहे. अनेक लोक आजही घरात माधुरी हाती बाबत लढत आहेत.कोल्हापूरमधून मला अनेक फोन येतात. मेसेंजर वर मेसेज येत असतात.. याबाबतीत राज ठाकरे यांनी देखील एक भूमिका घ्यायला हवी. हे दोन्हीही विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाच विनंती करून हे दोन्ही विषय मार्गी लावायला पाहिजेत. कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो, असे अनेक डॉक्टर म्हणतात. जैन समाजातील जे व्यक्ती डॉक्टर आहेत त्यांचे देखील तेच म्हणणे आहे. त्यामुळे यावर एकच तोडगा आहे की, शहराच्या बाहेर एखादा मोठा कबूतरखाना काढावा जिथे लोकवस्ती नसेल तिथे आपण आपला धर्म निभवावा असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.