विरार : विरारच्या चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या प्रकरणी मतदान केंद्रअधिकाऱ्यांनी शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास विरार पुर्वेच्या चंदनसार येथील क्रमांक६७ या मतदान केंद्रावर शर्मा हेअंगरक्षक आणि कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी या केंद्रातील मतदान केंद्र क्रमांक ११ येथे प्रदीप शर्मा आणि निवडणूक अधिकारी बाळकृष्ण मालोदे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी प्रदीप शर्मा यांनी दमदाटी करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणला असा आरोप मालोदे यांनी केला. याबाबत प्रदीप शर्मा यांनी सारे आरोप फेटाळून लावले असा आणि असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2019 रोजी प्रकाशित
प्रदीप शर्मा यांची मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दमदाटी
चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 22-10-2019 at 00:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradeep sharma dispute among polling booth officers zws