विजय राऊत, कासा 

महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सीमेवरील अच्छाड येथील ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकत ८ बारबाला व ११ पुरुषांना ताब्यात घेतले. तलासरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये काही बारबाला व पुरुष उशिरापर्यंत संगीतावर अश्लील नृत्य व कृत्य करत पैसे उडवत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर रिसॉर्टमध्ये बुधवारी रात्री धाड टाकून ८ तरुणी व ११ पुरुषांना ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये अवैधरित्या डान्सबार सुरु होते. या रिसॉर्टमधून पोलिसांनी ४८ हजार १५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रिसॉर्ट व्यवस्थापक आयोजक निपम सुरेशभाई शाह रा. भिल्लाड तसेच हसन शबीर खान राहणार काशिमीरा यांच्यावर विनापरवाना गैरमार्गाने कार्यक्रम चालू ठेवला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरुणी व पुरुषांवर भा.द.वि २९४, ११४, १०९, महा पो.अधिनियम कलम ३३ आर डब्ल्यू १३१ प्रमाणे अटक करून कोर्टात हजर केले. गुजरात महाराष्ट्र सीमा असल्याने ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये गुजरात राज्यातील पर्यटक येत असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चोरी छुपे अवैधरित्या डान्सबार, पार्टी यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असून अनेक गैरकृत्यही रिसॉर्ट मध्ये चालवले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.