ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरे झाले रक्षाबंधन

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण असून हा सण ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर साजरा करण्यात आला.

ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरे झाले रक्षाबंधन
( ठाणे महापालिकेच्या हजेरी शेडवर साजरे झाले रक्षाबंधन )

ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण असून हा सण ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर साजरा करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या एकूण ५० हजेरी शेड आहेत. या ठिकाणी महापालिकेचे १ हजार ९०० कर्मचारी असून त्यात १ हजार १४० पुरूष आणि ७६० महिलांचा समावेश आहे. तर एकूण २०३६ कंत्राटी कामगार असून त्यात १ हजार २२२ पुरूष आणि ८१४ महिला काम करीत आहेत.

महापालिकेच्या सर्व हजेरी शेडवर महिला कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. महापालिका प्रशासक व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डिजी ठाणे उपक्रमकरिता स्वारस्य अभिव्यक्ती निविदेला प्रतिसाद मिळेना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी