कल्याण: जीवनाच्या वाटचालीत यशस्वी व्हायचे असेल तर वाचन खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचन यज्ञाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

बालक मंदिर शाळा, सार्वजनिक वाचनालय आणि अक्षरमंच संस्थेतर्फे कल्याणमध्ये सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. प्रदीप ढवळ, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, बालक मंदिर शाळा कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. बालक मंदिर शाळेत हा कार्यक्रम झाला.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

हेही वाचा… “देवी महाराष्ट्रातील महिषासुरांचे मर्दन केल्याशिवाय राहणार नाही”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

वाचन हे आयुष्यात खूप महत्वाचे आहे. ते झटकन प्रसारीत होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या डोक्यात, मनात कायम राहते. ते शेवटपर्यंत आपली सोबत करते, असे अभिनेता कऱ्हाडे यांनी सांगितले.

वाचन करताना येणारे किस्से कऱ्हाडे यांनी मुलांना सांगितले. वाचनामुळे लहान माणसे पण जागतिक पातळीवर किती मोठी झाली हे उदाहरणासह कऱ्हाडे यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचन केले पाहिजे, असे आवाहन कऱ्हाडे यांनी केले.