scorecardresearch

युवा नोकरदाचा चार महिन्यांपासून नियमीत कल्याण ते ठाणे दररोज सायकलवरून प्रवास

शारिरीक सुदृढता, इंधन बचत आणि प्रदूषण मुक्तीचा देताय कृतीतून संदेश

कल्याण येथील एक युवा नोकरदार चार महिन्यांपासून नियमीत सायकलद्वारे ठाणे येथील आपल्या कार्यालयात कामावर जात आहेत. शालेय जीवनापासून सायकल आवडीचा विषय असल्याने कार्यलात सायकवरून जाण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. या निमित्त इंधन बचत, प्रदूषण मुक्ती, शारिरीक सृदृढता हे संदेश दिल्या जातात. याचा मला अभिमान वाटतो, असं तुषार ज्ञानेश्वर डेरे सांगतात.

तुषार डेरे कल्याणमधील रहिवासी आहेत. शालेय जीवनापासून त्यांनासायकलचे वेड आहे. सायकल चालवण्याच्या आवडीमुळे त्यांनी पहाटेच्या वेळेत वर्तमानपत्र, दूध घरोघरी पोहचविणे, बँकेच्या कर्जाच्या रकमा, आवर्त ठेवीच्या रकमा सायकलवरून जाऊन कर्जदार, ठेवीदारांकडून वसूल करणे, आदी कामं केली. यामुळे आपला सायकल चालवण्याचा छंद देखील पूर्ण होत होता, असे तुषार सांगतात. सायकलवरील प्रेमामुळे तुषार यांना महाविद्यालयीन जीवनात गर्लफ्रेंड या टोपण नावाने ओळखळे जायचे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची मनमानी, वाहतूक कोडींतून वाट काढणे, धावतपळत जाऊन लोकल पकडणे त्यानंतर प्रवाशांची धक्काबुक्की सहन करत ठाण्याला जाणे. तिथून परतल्यानंतर पुन्हा रिक्षासाठी धावाधाव इत्यादी अडथळ्यांच्या प्रवासा तुषार कंटाळले होते. हा असा प्रवास करून जीव दमवण्यापेक्षा दररोज सायकलवरून ठाण्याला कार्यालयात गेलो तर आपला छंदही पूर्ण होईल आणि शरीर देखील सुदृढ राहील. वेगळा वेळ काढून व्यायाम करण्याची गरज लागणार नाही. शिवाय, इंधन बचत, प्रदुषणाची होणारी हानी टाळणे हे देखील साध्य होईल. या विचारातून तुषार यांनी २९ नोव्हेबंर २०२१ रोजी १४ हजार रुपये किंमतीची सायकल खरेदी केली आणि आपली रोजचा प्रवास सुरू केला.

कल्याणहून सकाळी साडेआठ वाजता निघालो की सव्वानऊ  वाजे पर्यंत ठाण्यात पोहचतो. संध्याकाळी साडे सहा वाजता निघालो की  सव्वासात वाजेपर्यंत कल्याणला पोहचतो. या २५ किमीच्या प्रवासासाठी ५० ते ५५  मिनिटे लागतात.

वाहतुकीची कोंडी असली तरी एका बाजुने पुढे जाता येते. सायकल प्रवासात आपण आपल्या मनाचा राजा असतो. प्रवासातून पाऊस, थंडी यांचा अनुभव, पक्षांचा आवाज, बहरलेल्या फुलांचा सुगंध यांचा आस्वाद घेता येतो, याचबरोबर दुचाकीने गेल्यास या प्रवासासाठी चार हजार रुपये पेट्रोलवर खर्च होतात, त्यामुळे याची देखील बचत होते. शिवाय, सायकलाच व्यायाम परिपूर्ण असल्याने भूक व्यवस्थित लागते, झोप शांत लागते, मनशांती या सुखासिनतेचा आनंद घेता येतो. असे तुषार यांनी सांगितले.

कल्याण सायकलिंग क्लबचे आपण सदस्य आहोत.  आतापर्यंत २५ हजार किलोमीटरचा महाराष्ट्राच्या विविध भागात सायकल प्रवास केलेला आहे. यापुढे आपण नियमित सायकलवरून कार्यालयात जाणार आहोत. २०-३० किमी परिसरात कार्यालय असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सायकलचा विचार करावा. असे देखील तुषार डेरे यांनी आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Regular cycling from kalyan to thane from four months msr

ताज्या बातम्या