डोंबिवली जवळील कोळेगाव येथील बाजारात लष्करातून निवृत्त झालेल्या एका जवानाने बुधवारी रात्री स्वताच्या पिस्तुल मधून हवेत गोळीबार केला. या घटनेने कोळेगाव चौकातील बाजारात खळबळ उडाली.

हेही वाचा- डोंबिवली जवळील गोळवली रिजन्सी इस्टेट संकुलात दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट

सार्वजनिक ठिकाणी पिस्तुलातून हवेत गोळीबार करुन लोकांमध्ये घबराट पसरविणे, सार्वजनिक ठिकाणच्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी निष्काळजीपणे कृती केल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार विजय आव्हाड यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात निवृत्त लष्करी जवान विनेश विजय सुर्वे (४१, रा. सदगुरू रेसिडेन्सी, बदलापूर) यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाणे : महेश आहेर यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध; आव्हाड यांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सांगितले, आरोपी विनेश हे लष्करातून निवृत्त झालेले सैनिक आहेत. ते पलावा संकुल परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री काटई कोळेगाव येथील रस्त्याने जात असताना त्यांनी जवळील पिस्तुल मधून हवेत गोळीबार केला. त्यावेळी कोळेगाव बाजारात असलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. तात्काळ ही माहिती एका जागरुक नागरिकाने मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन विनेश यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुरेश मदने या प्रकरणाचा तपास करत आहेत.