ठाणे : ठाणे, नवी मुंबई परिसराला मंगळवारी संध्याकाळनंतर परतीच्या पावसाने झोडपले. अतिवेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे देवी विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांवर विघ्न आले. मंगळवारी रात्री नऊ वाजता जिल्ह्य़ाच्या ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी तसेच ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. डोंबिवली पश्चिम भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ठाण्यात दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. नवी मुंबईतही वीजांसह पाऊस पडला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2019 रोजी प्रकाशित
परतीच्या पावसाने उपनगरांना झोडपले
जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-10-2019 at 05:26 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Returning rains hit mumbai suburbs area zws