ठाणे : नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात विशेष राजशिष्टाचार नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या बुधवारी ठाण्यातील दौऱ्यादरम्यान टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम समोरील रस्ता बंद करून नागरिकांची अडवणूक करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे स्थानक परिसरात जाणारा प्रमुख रस्ता बंद झाल्याने त्याला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे दिसून आले. तसेच ठाणे स्थानकात जाण्यासाठी वळसा घालून प्रवास करावा लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे ही प्रथा रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले होते. तरीही बुधवारी ठाणे पोलिसांनी शहरातील रस्ते बंद करून वाहतूक रोखून धरल्याचे दिसून आले. गुरू पौर्णिमेनिमित्ताने बुधवारी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी आले होते. परंतु ते येण्याच्याआधी म्हणजेच दुपारी १ वाजल्यापासूनच टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम समोरील रस्ता पोलिसांनी बंद केला होता. टेंभीनाका ते जांभळी नाका चौक पर्यंत रस्ता मार्गरोधक उभारून बंद केले होते आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ठाणे स्थानक परिसरात जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरी वाहनांचा भार इतर रस्त्यांवर वाढून कोंडी झाली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर करूनही ठाणे पोलिसांनी मात्र त्यांच्या बुधवारच्या दौऱ्यादरम्यान विशेष राजशिष्टाचाराचे पालन केले. परिणामी अंतर्गत मार्गांवर कोंडी झाल्याने त्याचा मनस्ताप ठाणेकरांना सहन करावा लागल्याचे दिसून आले.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Rahul Gandhi Helicopter
हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे राहुल गांधींवर शहडोलमध्येच रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाची धावपळ
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक

येथे झाली वाहतूक कोंडी

आनंद आश्रमासमोरील रस्ता बंद केल्याने कोर्टनाका येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बाजारपेठे मार्गे वळविण्यात आली होती. तर, ठाणे रेल्वे स्थानकातून कोर्टनाका, उथळसरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची वाहतूक डाॅ. चिटणीस रुग्णालय मार्गिकेवरून वळविण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेतील मार्गिकेवर कोर्टनाका ते ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अशोक सिनेमागृहापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारच्या वेळेत कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना त्याचा फटका बसला. पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे अर्धा तास वाहन चालकांना लागत होता. तर कोर्टनाका, उथळसर भागात वाहतूक करणाऱ्या चालकांनाही चिटणीस रुग्णालयाजवळ वाहतूक कोंडीत अडकावे लागले.

अडीच वर्षांपूर्वीच निर्णय घेतले असते तर, ही वेळ आली नसती; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे : भाजपप्रणीत लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी आता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी याबाबतचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. अशा प्रकारचे निर्णय त्यांनी अडीच वर्षांपूर्वी घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती, असा टोलाही शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना  लगावला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये आले होते. येथे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार असून हे  स्थिर आहे.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्यासंबंधी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही भेट झाली आहे, ती सदिच्छा भेट होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.  राज्याच्या सर्वागीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करीत आहोत असे स्पष्ट केले.