ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ८ हजार २७८ कायस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षीइतकेच म्हणजेच १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी केली. पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीप्रमाणेच सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १२ ते १५ कोटींचा बोजा पडणार आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ८ हजार २७८ कायस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. करोना संकटामुळे महापालिकेचे जमा-खर्चाचे गणित बिघडले असून यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. परंतु करोनाकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली. पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्यावर्षीप्रमाणेच सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही एक महिन्याचे वेतन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanugrah grant announced for thane municipal corporation employees akp

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या