ठाणे – ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचा श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात कमळ आणि वॉटर लिली रोपांची लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या ‘मिशन- १०० डेज’ या उपक्रमाची सुरूवात अशा पद्धतीने करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय साहाय्यक म्हणून पल्लवी सरोदे या काम पाहत होत्या. सरोदे आणि त्यांच्या कार्यालयातील काही महिला कर्मचारी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. पर्यटनावेळी समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या दगडावर पल्लवी सरोदे या बसल्या होत्या. त्यावेळी आलेल्या समुद्राची एका लाटेच्या प्रवाहात सरोदे यांचा बुडून मृत्यू झाला. सरोदे यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये कमळ आणि वॉटर लिली या रोपांची लागवड केली आहे. तसेच शासनाच्या शासनाच्या मिशन-१०० डेज उपक्रमास या माध्यमातून सुरूवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, वृक्षतज्ज्ञ विजयकुमार कट्टी, समाजसेवक मोहन शिरकर आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

मिशन १०० डेज

शासनाच्या मिशन- १०० डेज अंतर्गत शासकीय कार्यालयांसाठी ७ कलमी कृती आराखडा लागू करण्यात आला आहे. या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जाणार आहे. त्यामध्ये ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात “टेरेस गार्डन” ही संकल्पना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ रोपांची लागवड करत या संकल्पनेची सुरूवात करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“टेरेस गार्डन” ही संकल्पना ठाणे शहरातील वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात येत आहे. कट्टी हे नागरिकांना डासविरहित परिसर ठेवण्याकरिता तसेच मानवी जीवनाकरिता इतर उपयुक्त झाडांची लागवड करण्याकरिता विनामूल्य मार्गदर्शन करतात. टाकाऊ झाडांपासून टिकाऊ झाडांची निर्मिती आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य ते करतात.