वसई : शहरात अडकलेल्या परप्रांतातील नागरिकांना घेऊन जाणार्म्या सात श्रमिक रेल्वेगाडय़ा मंगळवारी वसई  रोड रेल्वे स्थानकातून सोडण्यात आल्या. स्थानकावर जाण्यापूर्वी नावनोंदणीसाठी वसईच्या सनसिटी मैदानात हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. यामुळे सामाजिक दूरीच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदीमुळे रोजगार नसलेल्या आणि अडकलेल्या मजूरांना परराज्यातील त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने श्रमिक ट्रेन सोडण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसई रोड रेल्वे स्थानकातून या विशेष ट्रेन्स सोडण्यात येत आहेत. मंगळवारी मात्र एकाच दिवशी तब्बल सात गाडय़ा उत्तर प्रदेशासाठी सोडण्यात आल्या. त्यातील ४ गाडय़ा जौनपूरसाठी, २ गाडय़ा बधोईसाठी आणि एक गडी गोरखपूरसाठी सोडण्यात आली. पहिली गाडी सकाळी ११ वाजता सोडण्यात आली तर शेवटची गाडी रात्री साडेअकरा वाजता सोडण्यात येणार आहे. या गाडीत चढण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी आणि नोंदणी केली जाते. त्यासाठी त्यांना वसई पष्टिद्धr(१५५)मेच्या सनसिटी मैदानात बोलावण्यात येते. मात्र मंगळवारी एकाच वेळी सात गाडय़ा सुटणार असल्याने हजारो नागरिक सोमवार रात्री पासूनच सनसिटी मैदानात दाखल झाले होते. दिवसभर रणरणत्या उन्हात हजारो नागरिक ताटकळत बसून होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गर्दी जमल्याने त्यांच्यावर नियंत्रण करणे प्रशासनालाही अवघड झाले. यामुळे सामाजिक दुरीच्या नियमांचे अक्षरश: तीन तेरा वाजले होते. सनसिटी मैदानाला एका मोठय़ा जत्रेचे स्वरूप आले होते.

दिवसभर बायका मुलांसह परप्रांतातील नागरिक सनिसिटी मैदानात उन्हात ताटकळत बसले होते. सामाजिक संस्थांनी त्यांच्या पिण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. गाडीनुसार या प्रवाशांना वसई रोड रेल्वे स्थानकात सोडण्यात येत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven trains leave from vasai for uttar pradesh zws
First published on: 27-05-2020 at 04:12 IST