scorecardresearch

“दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून तिथे तुमची..”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. काय म्हणाले ते जाणून घ्या.

Naresh Mhaske criticize Uddhav Thackeray thane
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : काल इतक्या घाई घाईत मतांसाठी जैन मुनींना भेटायला गेले! दिघे साहेबांचे समाधीस्थळ मात्र लक्षात नाही राहिले. उद्धवजी, समाधी शिंदे साहेबांनी बांधली म्हणून तिथे तुमची पावले नाही वळली की बाळासाहेबांचे स्मारक अजून करू शकलो नाही, याची लाज वाटली? अशी टिका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा – आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने ठाकरे गटाकडून ठाण्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्धव ठाकरे हे त्यानंतर दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला अभिवादन करून जैन धर्मियांच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. आनंद दिघे यांचे समाधीस्थळ ठाण्यात बांधण्यात आले. या समाधीस्थळी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आल्यानंतरही त्यांनी तिथे भेट दिली नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:39 IST