ठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ठाणे महापालिकेत दाखल होत, नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, यांच्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार व नगरसेवकांची उपस्थिती होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन्ही पदांसाठी शनिवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादीकडूनही या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदावर नरेश म्हस्के यांची तर उपमहापौर पदावर पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली होती. आज केवळ त्याची औपचारीक घोषणा होणे बाकी होते. ठाणे महापालिका महापौर पदासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के आणि ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचे नावं आघाडीवर होते. त्यापैकी नरेश म्हस्के यांची अखेर महापौर पदावर वर्णी लागली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mayor deputy mayor unopposed on thane municipal corporation msr
First published on: 21-11-2019 at 13:34 IST