ठाणे – ठाणे शहराची ओळख म्हणजे तलावांचे शहर अशी प्रामुख्याने होते. शहरातील विविध तलाव नागरिकांच्या विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण आहेत. तर याच तलावांचे आकर्षण लक्षात घेत शहरातील विविध राजकीय नेत्यांकडून या तलावांच्या काठी विविध महोत्सवांचे देखील आयोजन करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर आत जिल्हा प्रशासनाकडून ठाण्यातील तलावांच्या पर्यटनवृद्धी साठी विशेष प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील तलावांचे लघुपट जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. या लघुपटांच्या माध्यमातून तलावांचा इतिहास आणि पर्यटनबाबत सविस्तर माहिती देऊन नागरिकांना तलाव पर्यटनासाठी आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे शहरात ज्या पद्धतीने औद्योगिकरणाचा इतिहास आहे, त्याच पद्धतीने या शहराला आणि जिल्ह्याला पर्यटनाचा देखील वारसा लाभला आहे. जिल्यातील विविध तालुक्यांमधील धार्मिक स्थळे आज राज्य देशपातळीवरील धार्मिक पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. तसेच जिल्ह्याला लाभलेली खाडी, खाडी किनारी येणारे विविध परदेशी पक्षी आजही अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. अंबरनाथ येथील सुमारे ९०० वर्षांहून प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी अनेक भाविक आज राज्यभरातून येत आहेत. याच पद्धतीने ठाणे शहरातील विविध भागांमध्ये असलेले मोठाले तलाव देखील आज नागरिकांच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात उपवन, मासुंदा तलाव, रायलादेवी, कचराळी, मखमली यांसह विविध तलाव शहारत आहेत. यातील उपवन आणि मासुंदा तलाव हे शहरातील इतर तलावांच्या तुलनेत अधिक प्रसिद्ध आहेत. या तलावांच्या परिसरात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या, लहानमुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे यांसह विविध सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. या दोन्ही तलावांच्या काठी सायंकाळी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर या तलावांच्या पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तलावांच्या काठावर होणारे नवरात्र उत्सव, दीपोत्सव, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ही देखील या ठिकाणांची एक वेगळी ओळख बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणांचा इतिहास, सौंदर्य आणि पर्यटकांकरिता असलेले आकर्षण हे व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून सध्या शहरातील महत्त्वाच्या तलावांवर आधारित लघुपटांची मालिका तयार करण्यात आली आहे. हे लघुपट समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत असून, यामध्ये तलावांचा ऐतिहासिक संदर्भ, त्यांच्या जडणघडणीमागील माहिती, त्यांच्याशी निगडित लोककथा, आणि पर्यावरणीय महत्त्व यांचा समावेश आहे. तलाव पर्यटनाला चालना देण्यासाठी हे लघुपट एक माध्यम म्हणून प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.