सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून ओळख असलेले ठाण्यातील प्रदीप इंदुलकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मेट्रो १२ ला गती ; सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

प्रदीप इंदुलकर हे शुक्रवारी काही खासगी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या वागळे इस्टेट येथील राहत्या घरी परत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते अचानक रस्त्यातच कोसळले. त्यांनतर त्यांच्या कुटुंबीयांनी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र शुक्रवारी रात्री १२ वाजता इंदुलकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. प्रदीप इंदुलकर यांची ओळख ही एक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून होती. ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, भ्रष्टाचार, वायू प्रदुषण, सार्वजनिक उत्सवांच्या काळात होणारे ध्वनी प्रदूषण याच्या विरोधात त्यांनी कायम आवाज उठला आहे. तसेच यांबत त्यांनी अनेक न्यायालयीन लढे देखील दिले आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील इंजिनीअर विद्यार्थ्याची कोल्हापूर येथे ३० लाखाची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रदीप इंदुलकर यांनी जाग (जॉइंट अँक्शन अँड अवेरनेस ग्रुप) या संस्थेची देखील स्थापना केली होती. याद्वारे त्यांनी एक सामाजिक चळवळ उभारली होती. तसेच अणूप्रकल्पा विषयी त्यांनी अणूरोध हे पुस्तक देखील लिहले आहे. तर जैतापूर प्रकल्प तसेच इतर अणूप्रकल्पांचे वास्तव दाखवणाऱ्या एका लघुचित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. या चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार घेण्यासाठी ते परदेशात गेले असता त्यांनी त्यांचा प्रवासाचे वर्णन करण्यासाठी जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन या पुस्तकाचे लिखाण केले आहे.