भाईंदर नायगावदरम्यान असलेल्या रेल्वेपूलावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी घडला. दरम्यान, सदर तरूणाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. तर त्याच दिवशी मीरा-भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक आत्महत्येचा प्रकार घडला.
भाईंदर आणि नायगाव दरम्यान असलेल्या रेल्वेपूलावर पहिला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पहायला मिळाला होता. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या तरूणाची ओळख पटली असून राजेश यादव असे त्या तरूणाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटली असून अद्याप त्याचा मृतदेह कोणीही ताब्यात घेतला नसल्याची माहिती मिळाली आहे.
तर दुसरी घटनाही नवघर पोलीस ठाण्याच्याच हद्दीत घडली. रविराज खाप या भाजीविक्रेत्यानेच आपल्या दुकानात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान, दोन्ही घटनांमधील आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.