ठाणे : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा, यासाठी पालिकेने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज, मंगळवारी करसंकलन केंद्रे सुरू राहणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभागसमिती कार्यालयात येऊन भरतात, अशा करदात्यांना त्यांचा देय मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 मंगळवार, ९ ऑगस्ट,  मंगळवार १६ ऑगस्ट आणि  शुक्रवार १९ ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी  सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत  करसंकलन केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेकरिता, मालमत्ता कराची देयके महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  ठाणेकर नागरिकांच्या सोईसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.