scorecardresearch

कल्याणमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण

मुलाचे वडील रमेश थापा यांना ही माहिती मिळताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शिक्षक तिवारी यांच्या विरुध्द तक्रार केली.

कल्याणमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण
शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

कल्याण– वर्गात मस्ती करतो म्हणून येथील रामबाग विभागातील आदर्श हिंदी शाळेतील अशोक तिवारी या शिक्षकाने एका पाच वर्षाच्या विद्यार्थ्याला छडी आणि हाताने बेदम मारहाण केली. विद्यार्थ्याला दुखापत झाल्याने त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलाचे वडील रमेश थापा यांना ही माहिती मिळताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शिक्षक तिवारी यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. शिक्षकाच्या या वर्तनाने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बहुमताची चाचणी केली तर १६४ चे संख्याबळ १८४ होईल – बावनकुळे

चिकणघर भागात थापा कुटुंबीय राहते. त्यांचा मुलगा निरंजन थापा हा आदर्श हिंदी विद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी तो शाळेत एका सहकारी मुलाबरोबर मस्ती करत होता. हा प्रकार तिवारी यांना सहन झाला नाही. त्यांनी निरंजनला छडी आणि हाताने बेदम मारहाण केली. घरी गेल्यानंतर निरंजनने घडला प्रकार वडिलांना सांगितला. निरंजनच्या हात, पाय आणि तोंडावर मारहाणीचे व्रण उठले आहेत. शिस्त लागण्यासाठी शिक्षकांनी कठोर राहावे पण त्यासाठी बेदम मारहाण हा त्यावरचा उपाय नाही, असे पालकांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 21:43 IST