ठाणे : दिवा येथील खर्डी गाव भागात नाल्यामध्ये १६ वर्षीय मुलगा वाहून गेल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. वसीम सय्यद असे या मुलाचे नाव असून त्याचा बचाव पथक शोध घेत आहेत.
हेही वाचा… पावसाने झोडपले! मुंबई, ठाण्यातील अनेक भाग जलमय; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत
दिवा येथे वसीम राहतो. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तो खर्डी गाव येथील नाल्यात पडला आणि वाहून गेला. घटनेची माहिती शीळ डायघर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. रात्री अंधार झाल्याने पथकाने शोधकार्य थांबवले. आज पुन्हा त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.