पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होऊन १९ दिवसांचा काळ लोटला तरी, पालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या कार्यालयांमध्ये वावर सुरुच असल्याचे चित्र होते. हि बाब निदर्शनास येताच उशीरा जाग आलेल्या प्रशासनाने गुरुवारी पालिका मुख्यालयातील पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांची कार्यालये बंद केली. यामुळे माजी पदाधिकाऱ्यांना आता कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी लागू झाल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ५ मार्च रोजी संपुष्टात आली असून या दिवसापासूनच नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. त्याचबरोबर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, गटनेते या पदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तरीही पालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालये मात्र सुरुच असल्याचे चित्र दिसून येते होते. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यालयांमध्ये वावर सुरु असल्याचे दिसून येत होते. सर्वपक्षीय गटनेत्यांची कार्यालयेही खुली होती. यामुळे येथे गटनेत्यांसह कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसून येत होती. प्रशासकीय राजवट लागू होऊन १९ दिवसांचा काळ लोटला तरी, ही कार्यालये बिनदिक्तपणे सुरुच होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane administration woke up late offices of office bearers in municipal corporation is closed now asj
First published on: 24-03-2022 at 18:41 IST